शिक्षकांनी स्वतःचे दायित्व समजून जागरुकपणे प्रयत्नशील राहण्याची गरज : राहुल संतोषवार

वर्गखोली आणि आर ओ प्लॉन्टचे लोकार्पण सोहळा संपन्न

प्रविण चिचघरे, पोंभुर्णा
जिल्हा निधी अंतर्गत इमारतीच्या बांधकामाकरिता जिल्हा निधी मधून निधी मंजूर करण्यात आले होते. गाव खेड्यामधील एकही विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने आवश्यक त्या सोयी सुविधा शाळेला पुरविल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळेला इमारत मिळाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व सामान्यांच्या पोरांची शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी स्वतरूचे दायित्व समजून जागरुकपणे प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल संतोषवार यांनी केले, ते तालुक्यातील सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद शाळा वर्गखोली बांधकाम व सातारा भोसले येथील आर. ओ. प्लान्टच्या लोकार्पण सोहळात बोलत होते.

राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल संतोषवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 14 लक्ष रुपये खर्चाच्या निधीचे सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद शाळा वर्गखोली,सातारा भोसले ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील आर ओ प्लांटचे लोकार्पण मंगळवारी (ता. 28) रोजी .पार पडले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल संतोषवार, सरपंच शालीना सिडाम यांचे शुभहस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच प्रवीण पेंदोर, सदस्य नितीन पेंदोर, समााजिक कार्यकर्ते श्रावण तोडासे, माजी सरपंच नानाजी तोडासे, माजी सरपंच कविताताई मडावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उष्टुजी मडावी, उपाध्यक्ष अर्चनाताई कोवे, गुलाब मडावी, सामाजिक कार्यकर्ते दशरथ सोनटक्के, राजेश्वर मडावी, भीमराव मडावी, शालूताई मडावी, ग्रामसेवक चिमुरकर, मुख्याध्यापक गांगरेडीवार, कर्मे मॅडम सोरते सर, सोरते मॅडम, ग्रा.पं.कर्मचारी विनायक पुठ्ठावार, कैलास पेंदोर, ऑपरेटर सचिन सिडाम, गणेश परचाके, नरेंद्र सिडाम, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.