मूल तालुक्यातुन होतोय खुलेआम गोधन जनावरांची अवैध वाहतुक

पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

मूल (प्रतिनिधी) : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जनावरांना वाहनात कोंबुन गेल्या काही दिवसांपासुन खुलेआम वाहतुक केली जात आहे मात्र वाहतुकदारावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पोलीस प्रशासनाने लक्ष देवुन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

रात्रौच्या वेळात ट्रकमध्ये जनावरांना कोंबुन मूल तालुक्यातुन मोठया प्रमाणावर इतर राज्यात वाहतुक केली जात आहे, मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी जनावरांचा आधार घेवुन शेती करीत होते, परंतु गेल्या काही वर्षात जनावरांची कमतरता असल्याने शेतकरी ट्रक्टर व यंत्राचा वापर करून शेती करीत आहे. तर बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी आता जनावरांचा आधार घेवुन शेती करीत आहे, मात्र गेल्या काही वर्षापासुन जनावरांची संख्या झपाटयाने कमी होताना दिसत आहे.

सावली-मूल तालुक्यातुन अवैध गोधन जनावरांची तस्करी कोणाच्या आर्शिवादाने या मथळयाखाली काही दिवसांपुर्वी दे धक्का एक्सप्रेस मध्ये वृत्त प्रकाशित केले होते, त्यांनतर काही दिवसातच उपविभाग पोलीस अधिकारी मल्लीकाअर्जुन इंगळे, सावलीचे पोलीस निरीक्षक बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिन मोठया कारवाई अवैध जनावारांची तस्करी करणाÚयांवर करण्यात आली होती, अशाच प्रकारची कारवाई मूल तालुक्यातुन होणाÚया गोधन जनावरांची अवैध तस्करी करणाÚयावर करण्यात यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.