खासदार बाळु धानोरकर यांच्या वाढदिवसानिमीत्य मूल येथे फळवाटप

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात कॉंग्रेस पक्षाकडुन फळवाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. उज्वलकुमार इंदुरकर, कॉंग्रेसचे युवा नेते अजिंक्य पाटील मारकवार, नांदगांव ग्राम पंचायतचे माजी सदस्य आशिष अहीरकर, अंशुल मोरे, उमेश इनमवार, सुमित कुचनकर, अमित मोरे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव आणि चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर यांचा वाढदिवस मोठया उत्साहात मूल येथे साजरा करण्यात आला, यावेळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते जोमाणे कामाला लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे