चंद्रपूर-मूल मार्गावर बस आणि ट्रकचा भिषण अपघात

मूल (प्रतिनिधी): मूल वरून चंद्रपूर जाणाऱ्या वस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात Accident अनेकजण जखमी Injured झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावर आज (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली.

परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 ए क्यु 744 ही मूल बस स्थानकावरून चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6255 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे, Bus#truck

घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.