खासदार धानोरकरांच्या वाढदिवसा निमीत्ताने कॉग्रेस नेते झाले सक्रीय

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण लागले तापायला

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हयाचे खासदार बाळु धानोरकर यांचा वाढदिवस मूल येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, यासाठी कॉंग्रेसचे नेते मोठया संख्येने उपस्थित राहुन उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप करण्यात आले, मागील अडीच वर्षात नव्हे ते यावर्षी खासदारांचा वाढदिवस साजरा केल्याने कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते सक्रिर्य झाल्याचे मूल तालुक्यात दिसून आले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसचा सुपडा साफ करीत भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले होते, मूल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3, पंचायत समितीचे 5 तर मूल नगर पालीकेत 16 नगरसेवक भाजपाचे निर्वाचित झाले होते, कॉंग्रेसचे पंचायत समिती मध्ये 1 तर नगर पालीकेत केवळ 1 नगरसेवक निवडुण आले होते, दरम्यान काही दिवसांवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीच्या तोंडावर आता कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते सर्कीय झालेले दिसुन येत आहे.

खासदार बाळु धानोरकर यांच्या वाढदिवस कार्यकमाला माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, मात्र कॉंग्रेसचे मूल येथील काही नेते उपस्थित नसल्याने कॉंग्रेस मध्येही गटबाजी आल्याचे दिसुन आले. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कभी खुशी कभी गम असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तालुक्यात असलेल्या या गटबाजीचा स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसला चांगलाच फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही..