श्रुती मारबतेने उंचावली एफ. इ. एस. कॉलेजची मान

संगीत विषयात नागपूर बोर्डातून प्रथम : 100 पैकी 99 गुण मिळवून ठरली अव्वल

चंद्रपूर (प्रतिनिधी) : फिमेल एज्युकेशन सोसायटी (एफ.इ.एस) द्वारा संचालित एफ.इ.एस.गर्ल्स कॉलेजची इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी कु श्रुती देवानंद मारबते हिला 2021-2022 या सत्रात झालेल्या परीक्षेतील संगीत विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले आहेत.

नागपूर बोर्डातून श्रुती प्रथम आली असून सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.श्रुतीच्या या नेत्रदीपक यशामुळे एफ.इ.एस.कॉलेजची मान उंचावली आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष ऍड. विजय मोगरे, सचिव  ऍड. सातपुते, शाळा समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी दिली आहे. संस्थेचे विश्वस्त शेंडे सर, श्रीमती पोटदुखे यांनी कौतुक केले असून श्रुतीने या यशाचे श्रेय प्राचार्य सौ बुटले, उपप्राचार्य सौ बेले व संगीत शिक्षिका सौ क्युरेशी यांना दिले आहे.

विसापुरवासी झाले आनंदित

श्रुती मारबते ही मुळात बल्लारपूर तालुक्यातील विसापूरची.तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक विसापूर येथे झाले. तिच्या पुढील शिक्षणासाठी तिचे आई वडील चंद्रपुरात वास्तव्यास आहेत.श्रुतीच्या यशाचे विसापुरातही कौतुक होत असून श्रुतीची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या वर्गशिक्षिका श्रद्धा भुसारी यांनीही कौतुक केले आहे.

संगीतात करियर करण्याचा संकल्प

मला संगीत खूप आवडते. गायनाची देण असतांना आई व बाबांनी खूप प्रोत्साहित केले.माझ्यासाठी त्यांनी विसापूर सोडले. खरे श्रेय त्यांचेच आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा माझा संकल्प आहे.

श्रुती देवानंद मारबते
एफ इ एस कॉलेज.