विविध जातीच्या वृक्षाचे केले रोपन
मूल (प्रतिनिधी) : जनकल्याण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुभाष प्राथमिक शाळेचे पदविधर शिक्षक, तालुका पत्रकार संघाचे माजी सचिव राजु गेडाम यांच्या वाढदिवसानिमीत्य नगर पालीकेच्या खुल्या भुखंडावर विविध जातीच्या वृक्षांचे रोपन करण्यात आले.
यावेळी मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, संवर्ग विकास अधिकारी घुनावत, नायब तहसीलदार यशवंत पवार, नायब तहसीलदार ठाकरे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्जवकुमार इंदुरकर, नगर पालीकेचे पाणी पुरवठा अभियंता श्रीकांत समर्थ, आरोग्य निरीक्षक अभय चेपूरवार, पब्लीक पंचनामाचे संपादक विजय सिद्धवार, सर्पमित्र उमेशसिंह झिरे उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासुन पत्रकार राजु गेडाम यांनी आपल्या वाढदिवसाचे निमीत्य साधुन वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत करीत असतात, यावर्षीही त्यांनी विविध जातीच्या वृक्षाचे रोपन करून समाजाला नविन दिशा देण्याचे काम करीत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी शशिकांत गणविर, बंडु अल्लीवार, अमोल वाळके यांनी अथक परिश्रम घेतले.