मुलीची हत्या करून पाण्याच्या टाकीत टाकले मृत्यदेह

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरदोली गावालगत असलेल्या वैनगंगा नदी काठावरील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर मुलगी ही कुरखेडा तालुक्यातील असुन मुलीची हत्या करून पाण्याच्या टाकी मध्ये शव ठेवल्याचे निदर्शनास आले. सदर हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी हे देसाईगंज येथील असुन एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.

ब्रह्मपुरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी हा फरार झाला आहे. पोलीस त्या आरोपीच्या मार्गावर असून लवकर त्याला अटक केली जाणार असुन त्यानंतर हत्येचा कारणांचा उलगडा होणार अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी दिली.

सदर मृतदेहाला ब्रम्हपुरी पोलिसांनी उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास संबधित ब्रह्मपुरी पोलिस करीत आहे