घरावर झाड कोसळल्याने संसार पडले उघडयावर

मूल तालुक्यातील जानाळा येथील घटना

खुशाल कुमरे, जानाळा
येथील एका मजुराच्या घरावर मोठे झाड अचानक कोसडल्याने त्यांचा संपुर्ण संसार उघडल्यावर पडल्याची घटना मूल तालुक्यातील जानाळा येथे घडली असुन सदर कुटुंबाची मोठी आर्थीक नुकसान झालेली आहे. प्रशासनाने आर्थीक व अन्नधान्यची मदत करण्याची मागणी रामचंद्र वेट्टी यांनी केली आहे. Large financial loss to the family

मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील रामचंद्र वेट्टी हे पत्नी जिजाबाई आणि मुलगा राजु यांचेसह जानाळा येथील ग्राम पंचायतच्या मागील परिसरात कवेलुचे घर बांधुन राहात होते, शनिवारी सकाळी 11 वाजता दरम्यान धुव्वाधार पावसाचे आगमण आणि वारा सुटल्याने जवळ असलेल्या सावरीचे मोठे झाड वेट्टी यांच्या राहत्या घरावर कोसळलेे, यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, घरावर झाड कोसळले तेव्हा राजु वेट्टी हा घरामध्येच होता मात्र सुदैवाने कुठलीही जिवीत झालेली नाही. Heavy rain

कुटुंबातील तिन जण मिळेल ती मजुरी करून संसाराचा गाळा चालवितात परंतु घरावरच झाड कोसळल्याने वेट्टी कुटुंबियांवर बेघर होण्याची पाळी आली असुन अन्नधान्यही पावसाने भिजल्याने अन्यधान्याचाही मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. प्रशासनाने आर्थीक व अन्नधान्याची मदत करावी अशी मागणी रामचंद्र वेट्टी यांनी केली आहे.  Mul taluka