अतिवृष्टीच्या पाण्याखाली डेकोरेशनचे साहित्य : लाखो रूपयाचे नुकसान

बेरोजगाची न्यायासाठी भटकंती

मूल (प्रतिनिधी) : गेल्या 2 दिवसापासुन मूल येथे धो धो पाऊस आल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान झालेला आहे, दरम्यान श्रमिक नगरामधील एका घरात ठेवलेले डेकोरेशनचे साहित्यही पाण्याखाली आल्याने जवळपास 3 लाख रूपयाचे नुकसान झालेले असुन झालेली नुकसान भरपाई मोका चैकशी करून देण्यात यावी अशी मागणी शुभम अशोक पोलोजवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि संबधीत यंत्रणेकडे केली आहे.

रोजगार नसल्याने बॅंकेकडुन कर्ज घेवुन श्रमिक नगर येथील रहिवासी शुभम अशोक पोलोजवार यांनी डेकोरेशनचा व्यवसाय उभारला होता, व्यवसाय सुरळीत सुरू असतानाच पावसाचे पाणी डेकोरेशनचे साहित्य ठेवलेल्या खोली मध्ये शिरल्याने, त्याठिकाणी असलेले डेकोरेशनचे लाईटींग, मशिन, कपडे व इतरही साहित्य पुर्णपणे पाण्याखाली आल्याने लाखो रूपयाचे नुकसान झालेले आहे, डेकोरेशन व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्ज भरायचे कसे असा प्रश्न शुभम पोलोजवार यांच्यासमोर उभा आहे.

संबधीत यंत्रणेने मोका चैकशी करून झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शुभम पोलोजवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगर पालीकेच्या मुख्याधिकाÚयांकडे केली आहे.