घर कोसळल्यांने, चार शेळयांचा मृत्यू, 10 शेळ्या जखमी

मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिचाळा येथील अंबादास निकेसर यांचे घर पडल्यांने, शेजारी गोठ्यात बांधून असलेल्या दिलीप बिजाजी लेनगुरे यांचे मालकिचे चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून, 10 शेळ्या जखमी झाल्या आहेत.

मूल वरून पाच किलो मिटर अंतरावरील चिचाळा येथे दिलीप बिजाजी लेनगुरे यांनी आपल्या गोठ्यात 14 शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. संततधार पावसामुळे दिलीप लेनगुरे यांचे शेजारी असलेल्या अंबादास निकेसर यांचे घर कोसळले. हे घर दिलीप लेनगुरे यांचे शेळ्या बांधलेल्या गोठयावर पडले. यामुळे झालेल्या अपघातात दिलीप लेनगुरे यांचे 4 शेळ्या जागीच मृत झाल्या असून, 10 शेळया जखमी झाल्या आहेत.

दिलीप लेनगुरे यांची मोठी नुकसान झाली असून, आपल्याला नुकसान भरपायी मिळावी अशी मागणी दिलीप लेनगुरे यांनी केली आहे.