अगनवाड़ी केंद्र क्र.४ येथे दोन वर्षांपासून आंगनवाड़ी सेवीकेचे पद रिक्त
बालकल्याण विभागाचा प्रताप
लोकमत दुधे, सावली
प्रभागातील बालकांच्या शिक्षणाची समस्या लक्ष्यात घेता आंगनवाड़ी सेवीकेचे रिक्त झालेले पद त्वरित भरण्या पेक्ष्या खाली रिक्त असलेल्या जागेवर मुख्यालयातील इतर काही आंगनवाड़ी सेविकांच्या वन बाय वन डीवटया लावल्याचा प्रकार समोर येत आहे यामुळे स्वताची अगनवाड़ी सांभाळुन अतिरिक्त आंगनवाड़ीचा डोलारा सांभाळावा लागत असल्याा दुहेरी भार आंगनवाडी सेविकांवर निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.
सावली येथील प्रभाग क्र १ येथील आंगणवाडी क्र ४ येथे आंगनवाड़ी सेविका अरुणा वरगंटीवार या पदमुक्त जवळपास दोन वर्षाचा काळ लोटला परंतु अजुनही आंगणवाडी सेविकेचे पद भरण्यात आलेले नाही, परिणामी केंद्राला सेविका नसल्याने तेथील केंद्राचा भार मदतनिस यांचेवर आला गेली दोन वर्षापासुन केवळ आंगनवाड़ी मदतनिस आंगणवाडी केंद्राचा कारभार चालवित आहे यामुळे बालकांचे शिक्षणावर परिणाम होत असल्याने सदर केंद्रात नव्या सेवीकेची नियुक्ति करावी अशी मागणी प्रभागातील बालकांच्या पाल्यानी केली असता रिक्त जागा न भरत सेवीकेचे पद खाली असलेल्या अगनवाड़ी केंद्र क्र. ४ येथे मुख्यालयतील इतर सेविकांची वन बाय वन अशी डिव्टी लावल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आज दुसऱ्या सेवीकेची तर उद्या तीसऱ्या सेवीकेची अशी अधुन मधून आळीपाळी डिव्टी लावण्यात येत आहे.
सावली मुख्यालयत ११ अगनवाड़ी केन्द्राचा समावेश असून अगनवाडी केंद्र क्र 9 मध्ये मदतनिस, केंद्र क्रं. ५ मध्ये मदतनिस, केंद्र क्रं. 8 मदतनिस, केंद्र क्रं. ४ मध्ये सेविकांचे पद रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार किवा केंद्रात एकटेच काम करताना कामाचा वाढलेला बोझा त्यातही बालकाना ने आन करने, खिचड़ी तयार करने, अहवाल आदी केंद्राचे काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे अश्या अतिरिक्त कामामुळे केंद्रातिल सेविका, मदतनिस यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत जन्म मृत्युची नोद, गरोधरमाता, स्तनदामाता, कुपोषित बालके, गृहभेटी, महिला मेळावे आदी कर्तव्य चोख बजाविताना शासन दरबारी प्रामाणिक सेवा देताना दिसतात मग अतिरिक्त पाळी लावण्यापेक्ष्या सेवीकेची रिक्त जागा भरने सोइचे होईल असा सुर दिसत आहे तेव्हा दोन वर्षापासुन आगनवाड़ी केंद्र क्र. ४ येथील रिक्त असलेले सेवीकेचे पद त्वरित भरण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.