आमदार मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला

  • पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम यांनी केली मध्यस्थी

प्रा. दिलीप मॅकलवार, पोंभुर्णा
गोंडपिपरी उपविभागीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र आणि नागरीकांचे अन्य दाखले मिळण्यास विद्यार्थी आणि नागरीकाना नाहक त्रास होत असल्याची तक्रार पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्काताई आत्राम यांच्याकडे केली होती, तक्रारची दखल घेत आत्राम यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे  सदर प्रकरणाची माहिती दिली. आमदार मुनगंटीवार यांनी याबाबत जिल्हाधिेकाऱ्याकडे तक्रार करून सदर प्रश्न मार्गी लावल्याने विद्यार्थी आणि  नागरीकांनी आभार मानले.

पोंभुर्णा आणि गोंडपिपरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बसतात, पोंभुर्णा येथील नागरीक आणि विद्यार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्राचे कामही गोंडपिपरी येथुनच होत असल्याने नागरीकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत होते, अनेकदा नागरीकांना प्रमाणपत्रासाठी गोंडपिपरीच्या चकरा माराव्या लागत होते मात्र काम होत नसल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, सदर समस्येवर पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्काताई आत्राम यांनी मध्यस्थी करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पत्र देवुन त्वरीत समस्या सोडविण्याच्या सुचना केल्या, आणि अधिकाऱ्यानीही यापुढे असे प्रकार होणार नसल्याचे आश्वासन दिले.

नागरीक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ, आणि पैस्याची बचत यानिमीत्याने होणार असल्याने नागरीकांनी पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्काताई आत्राम यांचे आभार मानले.