खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा : शिक्षक संघटनेची मागणी

चंद्रपूर (प्रतिनिधी) : मागील १६ वर्षापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर हे संघटनेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे परंतु काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी त्यांचा काटा काढण्यासाठी एका महिला संघटनेला हाताशी धरून गिरडकर यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा निंदनीय प्रकार केला आहे याविरूध्द विविध शिक्षक संघटनेच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देवुन सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता बाहेर आणुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण चे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी एका महिला संघटनेला हाताशी धरून खोटी तक्रार दाखल केली. याविरूध्द निषेध करण्याकरिता २० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समवेत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देवुन खोट्या तक्रारी करणाऱ्या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील अधिकाऱ्यांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता बाहेर आणावी व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अशा खोट्या तक्रारीमुळे संघटनेच्या कार्यावर व निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून केला गेला, त्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणावी अशी मागणीचे निवेदन अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत देण्यात आले. जिल्हा परिषद चंद्रपूर येथील शिक्षण विभागात अनेक वर्षापासून शिक्षक कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असून त्यांना कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून योग्य न्याय मिळविण्यास अडचण जात आहे.

यावेळी मुख्याध्यापक संघ चंद्रपूरचे जिल्हा सचिव विनोद पिसे, जिल्हा कोषाध्यक्ष अरविंद राऊत, संघटक जिवतोडे, प्रजासत्ताक शिक्षक संघ चंद्रपूरचे अध्यक्ष मारोती पाटील, उपाध्यक्ष नंदेश्वर, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष विनोद पांढरे, म. रा. शि. प. चंद्रपूरचे अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, कोषाध्यक्ष विलास खोंड, जिल्हा कॉन्व्हेट प्रमुख चंद्रपूरचे विवेक आंबेकर, जिल्हा महिला आघाडी चंद्रपूरच्या प्रमुख संध्या गिरडकर, प्राथमिक जिल्हाध्यक्ष सरीता सोनकुसरे, कोषाध्यक्ष रोहीणी वरभे, जिल्हा सहकार्यवाह करूणा ठाकुर, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख वसंत वडस्कर, उपाध्यक्ष गजानन शेळके, उपाध्यक्ष मनोहर झोडे, मंगला डांगरे, सौ. बंडीवार, सौ. गुंडावार, श्री. पेचे, श्री. विनय कावलकर, दिवक वाघे, विलास भागडकर, रेवस्कर, भांडारकर, बोरकर, धारणे, चवले, मुनीराज कुथे तथा विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.