शेततलावात उडी घेवुन युवकांची आत्महत्या

मूल तालुक्यातील नांदगांव येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : सततच्या नापीकीमुळे व कर्जबाजारीमुळे एका युवकाने शेततलावात उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील नांदगांव येथे 22 जुर्ले रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान घडली. सदाशिव प्रकाश भंडारे वय 29 वर्षे रा. नांदगांव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा नांदगांव येथील मनोहर रघुजी भंडारे वय 70 वर्षे यांना नांदगांव शेतशिवारात शेती आहे, सदर शेती त्यांचे नातु सदाशिव प्रकाश भंडारे वय 29 वर्षे हे करीत होते, शेती करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि बचत गटाकडुन कर्ज घेतले होते, त्यांनी शेतात धान आणि पऱ्हाटीची लागवड केली होती, मात्र सततधार पावसामुळे तिनदा पऱ्हाटीची लागवड करूनही काहीही फायदा होत नसल्याने मागील 8 दिवसापासुन तो आर्थीक विवंचनेत होता, दरम्यान शुक्रवारी सकाळी 8 वाजता दरम्यान जगदीश मोहुर्ले यांच्या शेतातील शेत तलावात उडी घेवुन आत्महत्या केली. यांच्या पश्चात मोठा आत्पपरिवार आहे.

पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थीक मदत करा: सागर देऊरवार
मागील अनेक दिवसापासुन सततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झालेले आहे, यामुळे नांदगांव येथील युवक सदाशिव प्रकाश भंडारे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या केलेली आहे, अतिशय हालाकीच्या परिस्थिीत जिवन जगणाऱ्या भंडारे कुटुंबियांना शासनाने आर्थीक मदत करावी अशी मागणी नांदगांवचे उपसरपंच सागर देऊरवार यांनी केली आहे.