शेतकऱ्याना महिना ५००० रुपये मोबदला आणि १० लक्ष रुपयाचा अपघाती विमा द्या

विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे यांची मागणी

चिमूर (प्रतिनिधी) : वीजकंपनी वीज वाहून नेण्यासाठी शेतकऱ्याच्या जागेचा वापर करत आहे मात्र जागेचा कोणताही मोबदला बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्या शेतातील जागेच्या ठिकाणी डीपी लावली असेल अश्या ठिकाणी व सभोवताल कोणतेही पीक घेता येत नाही अशा शेतकऱ्यांना महिना ५००० रुपये मोबदला आणि १० लक्ष रुपयाचा अपघाती विमा द्यावा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी केली.

शेतकऱ्यां ना वीज बिल भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या वीज कंपनीच्या अन्यायकारक धोरणाने शेतकन्यांचे वार्षिक बरेच नुकसान होत आहे. कंपनी वीज वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागेचा सतत वापर करत आहे त्यामध्ये खांब उभारणे, डिपी ट्रान्सफॉर्मर लावणे त्यातून कित्तेक पटीने वीज कंपनी नफा कमावते पण शेतकऱ्यांना त्याचा कसलाही फायदा होत नाही बरेचदा शेतातून गेलेल्या जिवंतविद्युत तारा जमिनीवर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आपले प्राण गमवावे लागले, शेतकन्याची गुरे ढोरे मरण पावली पण शेतकन्यांना त्यांचा कोणताही मोबदला मिळाला नाही,

याबाबत यापूर्वीच्या सरकारने विविध शासन निर्णय पारित केले पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही आता शिंदे सरकारने या गंभीर बाबीची दखल पडल्याने अनेक शेतकन्यांना घेऊन ज्या शेतकन्यांच्या शेतात डीपी ट्रान्सफॉर्मर आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा जमिनीचा किराया म्हणून महिना ५००० रु द्यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जिवंत विद्युत वाहक तारा आहेत त्यांच्या कुटुंबीयांना १० लक्ष रुपयेचा अपघाती विमा काढून द्यावा. जेणेकरून शेतात कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास याचा फायदा त्यांच्या कुटूंबियास होईल, अशी मागणी चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.