माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यावर

मूल येथील कार्यालयात भेट देवुन नागरीकांशी संवाद साधणार

मूल (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे 28 जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान गडचिरोली वरून चंद्रपूरकडे जात असताना मूल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाला दुपारी 12 वाजता दरम्यान भेट देणार असल्याचे सुत्रानी सांगीतले.

चंद्रपूर जिल्हयात सततधार पावसामुळे शेती आणि घरांचे आतोनात नुकसान झाले, यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे 28 जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली दौरा करणार आहे, गडचिरोली जिल्हयातील दृष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते चंद्रपूर जिल्हयाच्या दिशेने निघणार आहे, यावेळी मूल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात नामदार अजित पवार यांनी भेट देवुन मूल तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरीकांसोबत संवाद साधणार असुन नागरीाकांच्या समस्याचे निवेदन स्विकारणार आहेत.

नागरीकांनी समस्याचे निवेदन घेवुन मूल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात दुपारी 12 वाजता पर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांनी केले आहे.