विज पडुन युवा शेतकरी ठार# Farmer killed

मूल तालुक्यातील दहेगांव येथील घटना

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील दहेगांव येथील विलास रामुजी आलाम यांच्यावर दुपारी 1 वाजता दरम्यान विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना दहेगांव शेतशिवारात घडली. Farmer killed

मूल तालुक्यातील मौजा दहेगांव येथील विलास रामुजी आलाम वय 42 वर्षे यांचे नावाने चक दहेगाव शेतशिवारामध्ये शेती आहे. तो शेतात जावुन शेतकाम करीत असताना आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला, याचवेळी विलास आलाम यांच्यावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला, कुटुंबाचा कर्ता व्यक्ती विज पडुन ठार झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे

घटनास्थळावर मूल पोलीस आणि महसुल विभागाचे अधिकारी पोहचुन पंचनामा करीत आहे.