मानसिक नैराश्यातून युवकाची आत्महत्या

अनेक दिवसांपासून होता आजाराने त्रस्त

दिलीप मॅकलवार पोंभुर्णा  :- शहरातील महात्मा फुले चौकातील आजाराने त्रस्त असलेल्या एका  युवकाने मानसिक नैराशेतून आत्महत्या केल्याची घटना आज  ५ ऑगस्ट ला सात वाजता च्या दरम्यान उघडकीस आली.  अभय गुरुनुले वय 29 वर्षं असे मृतकाचे नाव असुन त्याच्या मृत्युने परीवारात व गावात शोककळा पसरली आहे.

मृतक अभय हा मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता. आजारामुळे त्याचे स्वास्थ बिघडले होते.पोटाचे दुखणे सहन होत नसल्याने मानसिक नैराश्य वाढले होते.शुक्रवारी दुपारला त्याच्या पोटाचा त्रास वाढल्याने त्याला वेदना सहन झाले नाही. संध्याकाळच्या सुमारास घराला लागून असलेल्या विहिरीत उडी घेऊन अभयने आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले सदर मृतकाला काढण्याचे प्रयत्न झाले पण विहिर तुडुंब भरून असल्याने व गाळेत मृतक फसला असल्याने त्याला वर काढता आले नाही.

मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, आणि मुलगी असून सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.