दिव्या नरड ने जिंकली “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स”ची ट्रॉफी

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकांवर मोहर

मूल (प्रतिनिधी) : वर्धा येथील देवली मधील एम.सि. इनडोअर स्टेडियम मध्ये पार पडलेल्या एल टी एस के ए आय राष्ट्रीय आमंत्रित खुली कराटे स्पर्धा 2022 मध्ये मूलच्या कराटे-फिटनेस क्लब च्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळविला.

मूल येथील कराटे-फिटनेस क्लबच्या श्रीजा सहारे हिने आपल्या वय आणि वजन गटात कुमिते आणि काता दोन्ही प्रकारामध्ये 2 सुवर्ण पदक, ,दिव्या नरड दोन्ही प्रकारात 2 सुवर्ण, विहान चौधरी ने दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदक पटकावले, तर यशस्वी येनुगवार हिने अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य, विधी कोटकोंडावार सुवर्ण आणि कांस्य पदक, नैतिक ढोबे सुवर्ण आणि कांस्य पदक, ,प्रेम नरड ने सुवर्ण पदक, सक्षम राजूरवार रजत पदक, अनुष्का येरमे रजत पदक आणि आहाना सहारे हिने कांस्य पदक पटकाविला. मूल येथील खेळाडुनी 10 सुवर्ण, 2 रजत आणि 4 कांस्य मिळून एकूण 16 पदके प्राप्त केली आहेत.

स्पर्धेचा आकर्षण असलेल्या ‘‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’’ प्रकारामध्ये दिव्या किशोर नरड हिने भाग घेतला होता ज्यात तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेची मुख्य ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. दिव्याने दुसÚ्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे यापूर्वी तिने नागपूर च्या राष्ट्रीय स्पर्धेत ‘‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’’ ही ट्रॉफी जिंकली होती.

विजयी सर्व खेळाडूंचे पालक,प्रशिक्षक आणि शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे. सदर सर्व खेळाडू कराटे-फिटनेस क्लब मूल मध्ये संचालक-प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम तथा सहप्रशिक्षक साहिल खान, सुमेध पेंदोर, हर्ष रोहनकर,अमान पठाण व साक्षी गुरनुले यांच्या मार्गदर्शनात नियमित प्रशिक्षण घेत होते..खेळाडूंना सेन्सेई विनय बोढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.