शेळयासाठी चारा आणणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतले#tiger attack

वाघाच्या हल्लात शेतकरी ठार

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : शेळयासाठी चारा गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बेलगांव मुरपार जंगलात 8 ऑगष्ट रोजी घडली. दुर्योधन जयराम ठाकरे रा. शिवणी ता. आरमोरी असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे. Farmer killed in tiger attack

गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील शिवणी येथील दुर्योधन जयराम ठाकरे हे मुलगा आशिष सोबत शेतात गेले होते, शेतालगत असलेल्या जंगल परिसरात मुलगा आणि वडील शेळयासाठी चारा आणण्यासाठी गेले होते, मुलगा झााडावर चडुन फांदया तोडुन खाली टाकत होते, झाडा खाली असलेल्या वडीलांनी फांदया जमा करीत असताना त्याठिकाणी वाघ येवुन दुर्योधन जयराम ठाकरे यांच्यावर हल्ला करीत फरफटत जंगलाच्या दिशेने घेवुन गेला, मुलगा आशिष झाडावर चढुन असल्यामुळे तो घाबरून गेला व काय करावे त्याला काहीही सुचनले नाही.

सदर घटना ही उत्तर वनपरिक्षेत्रातील असून वाघाने मृतदेह फरफटत दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत कोसंबी कक्ष क्र.१७५ मध्ये नेल्याचे आढळून आले. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले आहे व पुढील तपास वनविभाग करीत आहेत.