गुन्हा व इतर बेवारस जप्तीतील 52 मोटार सायकलचा लिलाव#Motorcycle auction

लिलावात भाग घेण्याचे पोलीस स्टेशनचे आवाहन

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : विविध स्वरूपातील दाखल असलेल्या गुन्हातील 52 मोटार सायकलचा लिलाव ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरात 14 ऑगष्ट रोजी आयोजीत केला आहे. सदर लिलावात नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ब्रम्हपूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी केले आहे. Police Inspector Roshan Yadav of Bramhpuri Police Station has appealed to citizens to participate

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असुन सदर गुन्हयातील जप्त मोटारसायकल हे संबधित गाडी मालकांना वारंवार सुचना देवुनही घेउन न गेल्याने ते पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक वर्षापासुन पडुन आहेत. त्यामूळे त्यांचे निर्गती करण्याबाबतच्या सुचना न्यायालयाने आपल्या निकालपत्रात दिलेल्या आहेत. पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त बेवारस मोटार सायकल बाबत उपविभागिय दंडाधिकारी, ब्रम्हपुरी यांचे आदेशाने उद्घोषणा काढुन सार्वजनिक ठिकाणी त्याबाबत प्रसिध्दी देण्यात आलेली आहे. Auction of 52 motor cycles in various registered cases

सदर प्रसिध्दीनंतरही कुणीही नमुद वाहनावर दावा करण्यास आलेले नाही. त्यामूळे नमुद मोटारसायकलचे लिलाव करण्याच आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला आहे, त्यानुसार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे 14 ऑगष्ट रोजी सकाळी 10 वाजता सुमारे 52 मोटारसायकलचा लिलाव करण्यात येणार आहे, सदर लिलाव प्रक्रियेत नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी केले आहे. 14th August at 10 am