‘‘हर घर तिरंगा’’ विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप

सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : स्थानिक महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोयायटी मुंबई व एम के सी एल मान्यता प्राप्त सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर मूलच्या वतिने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत शासनाने ठरवुन दिलेल्या नियमावली नुसार विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज शुक्रवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयात वितरीत करण्यात आले.

15 ऑगष्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षे पुर्ण होत आहे, त्यानिमीत्ताने संपुर्ण भारतात आझादी का अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात येत आहे. यासाठी शासनाने ठरवुन दिलेल्या नियमावली नुसार हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी होता यावे यासाठी मूल येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोयायटी मुंबई व एम के सी एल मान्यता प्राप्त सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरनी विद्यार्थ्याना तिरंगा ध्वज वितरीत केले.

यावेळी कौशल्य विकास चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, सक्सेस कॉम्युटर्सचे संस्थाप्रमुख नितीन येरोजवार, संचालिका आशा नितीन येरोजवार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.