माजी.पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी

तालुका कॉंग्रेसचा पुढाकार

सुधाकर दुधे, सावली
सावली तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सावली येथील जनसंपर्क कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांची 78 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते .मोतीलाल दुधे, कॉंग्रेसचे सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहने, महिला तालूकाध्यक्ष उषाताई भोयर, सावली शहराध्यक्ष तथा नगरसेवक विजय मुत्यालवार, महिलाध्यक्षा भारती चौधरी, सावलीच्या नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपाध्यक्षा संदीप पुण्यपकार, नगरसेवक प्रीतम गेडाम, गुणवंत सुरमवार, .प्रफुल वाळके, नगरसेविका सिमा संतोषवार, प्रियंका रामटेक, .प्रशांत राईचंवार, मुखरू गोहणे, शरद कन्नाके, कविता मुत्यालवार उपस्थित होते.

माजी. पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांनी भारतात आयटीची क्षमता आणी महत्व लक्षात घेऊन जवळपास तीन दशकापूर्वी देशात आयटी युगाची पायाभरणी केली होती. माहिती व तंत्रज्ञानात, आधुनिक शिक्षणात,, निती व परराष्ट्रीय संबंधामध्ये देशात आज जी प्रगती बघायला येत आहे त्यामागे राजीवजी गांधी यांची दूरदृष्टी होती. भारताला महासत्ता बनविण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात अथक परिश्रम घेतले. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरित करणारे होते. अशी प्रतिक्रिया या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केळी. दरम्यान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्याचे औचित्य साधुन सावली तालुका काँग्रेस कमिटीचा वतीने ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळे व बिस्कीटे आणि जिल्हा परिषद शाळा क्रं. १, जिल्हा परिषद.शाळा क्र. २ व आंगणवाडी येथील विध्यार्थाना बिस्कीटे वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.