जागतिक छायाचित्र दिनानिमित्य जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा सत्कार

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती

चंद्रपूर (प्रतिनिधी) : स्थानिक छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधुन 19 ऑगस्ट रोजी शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे जिल्हातील छायाचित्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आला, अध्यक्षस्थानी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष नितीन रायपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, सामाजिक कार्यकर्ते फुलचंद मेश्राम, राजू जोशी, विकास गोठे, सुनील व्ही. जे, मनोज टहलियानी, अनिल टहलियानी, अभय किरक्टे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश मोगरे चंद्रपूर, तेजराज जानबा भगत चंद्रपूर, ज्ञानेश्वर मुखर्जी डांगे नागभीड, यशवंत कडूजी बांबोडे सावली, पुंडलिक दादाजी गुरनुले चिमूर, सुशांत दिगंबर वाकडे मुल यांचा तर गुणवंत विद्यार्थी संकेत राजेश कार्लेकर चंद्रपूर, संस्कृती विनोद झोडे भद्रावती, हर्षदा सतीश दिवाणजी चंद्रपूर, सिद्धांत ज्ञानेश्वर डांगे नागभीड, कैलास संजय बांबोडे नागभीड, वरेश विकास गोठे चंद्रपूर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पोस्ट ऑफिसचे वतीने लावण्यात आलेल्या 399 रुपयाचा अपघाती विमा शिबिराचा जिल्ह्यातील ७० छायाचित्रकारांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरूवात छायाचित्राचे जनक लुईस डगोरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील छायाचित्रकार एकत्रित येत सकाळी जटपुरा गेट ते गिरणार चौक-गांधी चौक मार्गे जटपुरा गेट अशी कॅमेरा दिंडी काढण्यात आली. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार, इयत्ता दहावी तथा बारावी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या छायाचित्रकाराच्या अपत्यांच्या तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील व्हि. जे. तसेच सचिन पांढरे यांचे फोटोग्राफी व्यवसायाबद्दल उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गोलू बाराहाते, नंदू सोनारकर, विशाल वाटेकर, टिंकू खाडे, विपिन मेंढे,  प्रीतम खोब्रागडे, देवा बुरडकर, अमोल मेश्राम, साजन रायपुरे, योगेश हूड, योगेश धकाते, नरेश वनकर, पवन प्रसाद, सुमित वैरागडे, प्रदीप शर्मा, जितेंद्र शेंडे, स्वप्निल तावाडे, अनिकेत बुग्गावार, छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सभासद व पोस्ट ऑफिसचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन अश्विनी खोब्रागडे तर कार्यक्रमाचे आभार सुशांत वाकडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते.