आसोला मेंढा तलावाच्या नहरात 5 बालके बुडाले

एक मुलीचा अजुनही पत्ता नाही : शोध कार्य सुरू : चार मुलांना सुखरूप बाहेर काढले

सावली (प्रतिनिधी): तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या नहरामध्ये कपडे धुण्यासाठी आई सोबत गेलेल्या 5 मुलांपैकी 4 जण आंघोळ करीत असतांना पाण्यात बुडाले. ही बाब सोबत असलेल्या काजलला लक्षात येताच तिनेही पाण्यात उडी घेत त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केली. मात्र बालके बुडत असल्याचे एकच कल्लोड झाल्याने जवळच असलेल्या शासकीय गोडावुन मधील मजूर बालु भंडारे यांनी त्वरीत त्या नहरात उडी घेत त्यातील 4 बालकांना सुखरूप बाहेर काढले परंतु 4 बालकांना वाचविण्यासाठी उडी घेणारी काजलचा अजुनही पत्ता लागलेला नाही, ति कुठे वाहत गेली याचा शोध घेणे सुरू आहे.

आसोला मेंढा तलाव चंद्रपूर जिल्हायात प्रसिध्द आहे, याठिकाणी दुरदुरून पर्यटक येवुन पाण्यात आनंद लुटतात, आज सकाळी 10 वाजता दरम्यान रोहित मेडपल्लीवार, अमित मेडपल्लीवार, राहुल मक्केवार, सुश्मिता मक्केवार हे तलावाकडे कपडे धुण्यासाठी गेले होते, दरम्यान पाण्यात आंघोड करीत असताना चारही जण खोल पाण्यात जाऊन बुडत असल्याचे सोबत असलेल्या काजल मक्केवार हिच्या लक्षात आल्याने ति पाण्यात उडी घेवुन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिच वाहत गेली, वृत्त लिहेपर्यंत काजलचा शोध लागलेला नाही.

सदर घटनेची माहिती सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत काजलचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.