रानटी डुक्कराने केला दोघांवर हल्ला # Wild boar attack

जखमींवर उपचार सुरू

सुधाकर दुधे, सावली
सावली शहरापासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या चकपिरंजी येथील दोन इसमांना सकाळी 6 वाजता दरम्यान रानडुक्करांने जखमी केले असून त्यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मार्कंडी नारायण तोरे, वासुदेव डोनु नागपुरे असे जखमींचे नांव आहे.Wild boar attack

सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील मार्कंडी नारायण तोरे हे नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता दरम्यान आपल्या अंगणात ब्रश करीत होते. दरम्यान रानटी डुक्कराने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले तर वासुदेव डोनू नागपुरे हे गावातीलच पाण्याच्या टाकीजवळ उभी असताना त्यांच्यावरही रानडुक्करांने हल्ला करून जखमी केले. ,नागरिकांनी आरडाओरडा केले असता रानटी डुक्कर पळून गेला .जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु गंभीररित्या जखमी असल्याने  सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. Two people were injured

सदर दोन्ही व्यक्तीं गंभीर जखमी झाल्याने त्यांना आर्थिक मदत देऊन रानटी डुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांन केली आहे.