विविध गुन्हातील दुचाकीचा होणार लिलाव

तळोधी (बा.) (प्रतिनिधी): विविध गुन्हामध्ये जप्ती करण्यात आलेल्या दुचाकींचा लिलाव न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑगष्ट रोजी करण्यात येणार आहे, सदर लिलावामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक डि. आर. शेंडे यांनी केले आहे.

तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्हयात जप्त करण्यात आलेल्या 10 दुचाकीवर कोणीही आपला अधिकार दाखविलेला नाही, न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑगष्ट रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. सदर लिलाव प्रक्रियेमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक डि. आर. शेंडे यांनी केले.