पोस्ट मास्तरची गळफास घेऊन आत्महत्या

मांडवा येथील डाकघरात होते पोष्ट मास्तर

कोरपना (प्रतिनिधी) : येथील आदिलाबाद मार्गावरील एका इमारतीत शाखा पोस्ट मास्तरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार ३० ऑगष्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली. साहिल साजिद शेख वय 28 वर्षे असे आत्महत्या केलेल्या पोष्ट मास्तराचे नांव आहे.

कोरपणा तालुक्यातील मांडवा येथेील डाकघरातील पोष्ट मास्तर साहिल साजिद शेख हे कोरपना येथील आदिलाबाद मार्गावरील एका धाब्याच्या समोर असलेल्या इमारतीत तो किरायाने राहत होता. याच इमारतीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपणा पोलीस करित आहे.