जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक

नविन इमारतीचे बांधकाम करण्याची शोध विचार वेधचे गौरव शामकुळे यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी शाळा जून पासून पुन्हा सुरू झाल्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले मुलांना शिक्षण आनंदी वाटावे आणि शाळेत मुलांचे संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र शहरातील गांधी चौक मुल मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दुरस्त्यामुळे या शाळेची इमारत धक्कादायक बनली आहे. कित्येक वर्षापासून शाळा दूर स्थितीच्या प्रतीक्षेत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात शाळा असूनही दुरावस्था व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या शाळेची संद्या विद्यार्थी संख्या घटक असल्याने शाळा हो सोड पडू लागली आहे. सध्या पावसाळा असल्याने पाऊस आला की वर्गात पाणी शिरते शाळेचे छत घडू लागले आहे शाळेतील भिंत अजीर्ण झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असे माजी विद्या पंकज जयस्वाल म्हणणे आहे .इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे शाळेच्या इमारतीचे बांधकाम कालबाह्य झाल्याने दुरवस्था झाली आहे तसेच विद्यार्थी संख्या ही घटक आहे विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शाळेकडे पाठ फिरवली आहे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितनी लक्ष देऊन शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी पालक करीत आहेत.

लवकरात लवकर इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी एक महिन्याच्या आत शाळा दुरुस्ती व नवीन इमारतीचे काम न केल्यास शाळेला कुलूप फुकून गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनात आंदोलनात करण्यात येईल याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असा इशारा शोध विचार वेधचे गौरव शामकुळे यांनी दिले आहे.