शेत तलावात बुडून युवकाचा मृत्यू

शंकरपूर (प्रतिनिधी): येथील एका युवकाचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडलेली आहे सुहास रमेश रंदये वय 16 वर्ष असे मृतकाचे नाव आहे

चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील सुहास रमेश रंदये वय 16 वर्ष व याच्यासोबत चार-पाच जण राजू सावसाकडे यांच्या शेतात शेत पिकाला खत मारण्यासाठी मजुरीने गेले होते शेताला खत मारून झाल्यानंतर त्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर हात पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले पाण्याचा खोल अंदाज न आल्याने सुहास रमेश रंदये हा बुडू लागला सोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरड केल्याने जवळपास चे सर्व शेतकरी जमा झाले परंतु तोपर्यंत त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनाम करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालया चिमूर येथे पाठविले आहे आधीक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे व सहकारी करीत आहे