व्याहाड खुर्द (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षी कोरोना रोगच्या प्रादुर्भावामुळे भारतात कुठेही, कुठल्याही कार्यक्रमाला परवाणगी मिळालेली नव्हती. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. मात्र ह्या वर्षी मात्र कोरोना त्या प्रमाणात नसल्याने आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवाणगी देत असल्याने मंडळाने मोट्या आनंदाने बाप्पाच्या आगमनाने आनंदात उत्साह साजरा करीत आहे. सावली तालुक्यातील सोनापूर येथील युवा सार्वजनिक मंडळाने एक गांव एक गणपती हा उपक्रम राबवित असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करीत आहे.
सावली तालुक्यातील सोनापूर येथे होळी चौकात युवा सार्वजनीक मंडळाच्या वतीने गणरायाची घटस्थापाना करण्यात आली. कार्यक्रमाला सोनापूर येथील गाव कमेटीचे अध्यक्ष डोमाजी शेंडे, युवा सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर वाघाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर बांबोळे, श्रीधरजी, पांडूरंगजी कोसरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर रणदिवे, अतुल पा गोहने यासह युवा सार्वजनीक मंडळाचे सदस्य, गावातील महिला, बालगोपाल उपस्थित होते