ऑटो पलटून एक प्रवाशी ठार

दोन प्रवाशी जखमी

बल्लारपूर  (प्रतिनिधी) :  तालुक्यातील येनबोडी जवळ ऑटो आणि चारचाकी मालवाहक वाहनाची टक्कर होऊन ऑटो पलटल्याने ऑटो मधील एक प्रवासी जागीच ठार झाला. तर ऑटो चालकासह दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रौ 12 वाजता दरम्यान घडली.. आनंदा इंद्रपाल दहागावकर वय 21 वर्षे रा. सकनुर ता. गोंडपिपरी असे मृतक महिलेचे नाव आहे तर गुनेश्वर राजेश्वर तोहगावकर वय 24 वर्षे  व ऑटो चालक अमित तांगडे वय 27 वर्षे रा. सकनुर अशी जखमीचे नाव आहे..

मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर वरून ऑटो क्रमांक एम एच 34 बी एच 1947 हा प्रवासी भरून कोठारी मार्गे सकनूर चे दिशेने जात होता. येनबोडी जवळ समोरून येत असलेल्या हाथी या चार चाकी मालवाहक वाहनाची ऑटोला  जबरदस्त धडक बसली. त्यातील आनंदा इंद्रपाल दहागावकर वय 21 वर्षे रा. सकनूर ही ठार झाली तर गुनेश्वर राजेश्वर तोहगावकर वय 24 वर्षे  व ऑटो चालक अमित तांगडे वय 27 वर्षे रा. सकनुर हे जखमी आहेत.

बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात हलविले. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.