संत निरंकारी मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर संपन्न

सतत सात वर्षापासुन रक्तदान शिबीराचे आयोजन: 65 रक्तदात्यानी केले रक्तदान

मूल (प्रतिनिधी): संत निरकांरी चॅरीटेबल फाऊंडेशन (दिल्ली) शाखा मूलच्या वतिने सतगुरू माता सुदिक्षाजी सविनंदर हरदेव सिंह महाराज यांच्या असीम कृपेने दरवर्षी प्रमाणे यावर्षी 3 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन येथे करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन झोन इंचार्ज प. पुज्य किशनजी नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मूल शाखा प्रमुख लक्ष्मणजी निकुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन नांदगांव शाखेचे प्रमुख खुशाल झोडगे, चामोर्शी शाखेचे प्रमुख अशोक बोरकुटे आदी उपस्थित होते.

यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 45 नागरीकांचे शुगर, बि पी, हिमोग्लोबिन तपाण्यात आले. 3 सप्टेंबर रोजी रक्तदान जनजागृती रॅली मूल शहरात काढण्यात आली होती.

रक्तदान शिबीरासाठी गडचिरोली येथील रक्तसंकलन पथकाचे रक्त संकलन अधिकारी डॉ. अशोक तुमरेटी, सतिश तकडलावार, रक्त संकलन तत्रज्ञ पंकज निकोडे, कु. मोहिनी चुटे, निलेश सोनवणे, जिवन गेडाम, कु. प्रतिक्षा कांटगे, बंडु कुभारे यांनी सहकार्य केले.

सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवादल प्रमुख महेश रेड्डीवार, गोविंद कटकेलवार, भोजराज सिडाम, कवडु कोल्हे, मारोती भोयर, अर्चना लेनगुरे, वागुजी नक्शुलवार, डॉ. नामदेव सोनुले, संतोष निकुरे यांनी अथक परिश्रम घेतले.