‘‘त्या’’ आरोपीची तीन दिवसासाठी पोलीस कोठड़ीत रवानगी

गायडोंगरी बांध येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण

सावली (प्रतिनिधी) : सावली तालुक्यातील गायडोगरी बांध येथे सोमवारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी धनराज गुरूनुले यांना आज सावली न्यायालयात हजर केले असता तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सावली तालुक्यातील गायडोेंगरी बांध येथील मनोहर गुरूनुले आणि धनराज गुरूनुले या सख्या भावांमध्ये रस्त्यावरून मागील काही दिवसांपासुन वाद सुरू होता, सोमवारी याच कारणावरून भांडणाला सुरूवात झाली, दरम्यान धनराज गुरूनुले यांनी मोठे भाऊ मनोहर गुरूनुले यांना सबलीने मारहान केल्याने ते जागीच ठार झाले तर देराकडुन पतीला मारहान होत असल्याचे पाहुन मनोहर गुरनुले यांची पत्नी शारदा ही सोडवायला गेली असता तिलाही देराकडुन मारहाण् झाली. शारदा गुरूनले हिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सदर दुहेरी हत्याकांडातील आरोपी धनराज गुरूनुले यांच्याविरूध्द पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कलम 302, 307 आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी धनराज गुरूनुले याला मंगळवारी सावली न्यायालयात हज़र केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठड़ी सुनावली. पुढील तपास पाथरीचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात नारायण येगेवार, अशोक मोहूर्ले, वसंत नागरीकर, सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे, जनार्धन मांधाळे, राजू केवट करीत आहे