Home Breaking News महिलेची विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

महिलेची विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

आझाद वार्डातील घटना

चिमूर (प्रतिनिधी) : येथील आझाद वार्डात राहात असलेल्या एका विधवा महिने विहीरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्रौ उघडकीस आली. कविता आशीष पाटील वय 35 वर्षे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नांव आहे.

पतीच्या मृत्युनंतर कविता पाटील हया मुलासोबत गुरुदेव वार्ड चिमूर येथे सासुकडे राहात होती, परंतु सासु सोबत काही कारणाने पटत नसल्याने कविता माहेरी कुरखेडा तालुक्यातील वासी येथे राहायला गेली, निराधार योजनेचे पैसे उचलण्यासाठी ति शनिवारी आझाद वार्ड येथे राहणाऱ्या नातलगाकडे आली होती. सोमवारला आजारी असलेल्या सासुला भेटण्यासाठी नागपूरला गेली आणि पाहुन आली. रात्री जेवन करून झोपल्यानंतर कविता बाधरूमच्या बहान्याने साडे दहाच्या सुमारास बाहेर पडली .आणी शेजारीच असलेल्या मावस सासु संध्या जारूंडे यांच्या विहिरीत उडी घेतली.

बाथरुमला गेलेली कविता उशीरा पर्यंत परत आली नाही म्हणुन नातलगांनी सर्वत्र शोध घेतला. विहिरीचे कठडे बाजुला सरकल्याचे दिसल्याने विहिरीत टार्चच्या मदतिने पाहीले असता कविताचे प्रेत तरंगताना दिसले. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस उप निरीक्षक अलिम शेख, पोलिस हवालदार विलास निमगडे, राहुल चांदेकर यांचे सह घटनास्थळावर पोहचुन तरुणांच्या मदतीने प्रेत विहिरीतुन काढून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणी करीता उप जिल्हा रूग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन घटनेचा मर्ग दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!