चलो बुध्द की और कार्यक्रम १४ ला चंद्रपूरात : २२२ बुद्ध मूर्तींचे वितरण

सिनेअभिनेता गगन मलिक यांची उपस्थिती : पत्रकार परिषदेत माहिती

अतुल कोल्हे भद्रावती 
गगण मलिक फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने व्हिएतनाम या देशातून आलेल्या २२२ बुद्ध मूर्तींचा भव्य वितरण कार्यक्रम दिनांक १४ रोज गुरुवार ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल येथे सायंकाळी चार वाजता करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला अध्यक्ष सिनेअभिनेता गगन मलिक, उद्घाटक भिक्खु थीच बिन ताम व्हिएतनाम, भिक्खुनी थीच नो निगीयम ताम, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी खासदार नरेश पुगलिया, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, श्रीनिवास गोमासे, राजु झोडे, प्रविण खोब्रागडे, नितीन गजभीये, ह्युएन ली, लिन्ह फाम, फुक एनघिया,  तुआन वो, तुंग एनगुयेन आदी उपस्थित राहणार आहेत.

सम्राट अशोकाच्या ध्येयाला अनुसरून संपुर्ण भारत देशात ८४ हजार बुद्ध मूर्तीचे वितरण करण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चलो बुध्द कि ओर या कार्यक्रमाचे आयोजन देशभरात म्हणवले जात आहे. दिनांक १४ ला चंद्रपूर येथे प्रियदर्शनी हॉल येथे विदेशी भिक्खु व मान्यवर यांच्या उपस्थितीत बुद्धमूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी गगन मलिक फाऊंडेशनचे विनय बोधी डोंगरे, अनु देगावकर, गोपाल रायपुरे, सुरज गावंडे, विकास तायडे , जयदेव खाडे, अमित वाघमारे, एन डी मेश्राम, सुनील पाटील, प्रियवंद वाघमारे, बि. डी. देशपांडे, मोरेश्वर चंदनखेडे आदी उपस्थित होते.