झाडी युवा चौतन्य पुरस्कारासाठी रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे यांची निवड

मूल (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाÚ़्या कार्यकर्त्याचा दरवर्षी झाडी युवा चैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो, यावर्षी मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ आणि सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य गणेश खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे.

झाडी युवा चौतन्य पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, जिल्हा महिला अध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर, जिल्हा सदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले.

झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ व ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे यांना 18 सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

रंजित समर्थ हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील युवा सरपंच व गणेश खोब्रागडे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य असून आपल्या अभ्यासू वृत्तीने गावविकासासाठी झटून विविध योजनांची यशस्वी अमलबजावणी केली आहे . सामाजिक भान असलेले रंजित समर्थ एकलव्य मंडळाच्या माध्यमातून व गणेश खोब्रागडे प्रहार सेवाधर्मी मंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसांची जोपासना व संवर्धनाचे अनमोल कार्य करीत आहेत.

साहित्यावर प्रेम असलेले रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याकरिता 29 वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला येथे आयोजित करून पंचक्रोशीत सर्वांना साहित्य विश्वाची अनुभूती दिली. कोणावर विसंबून न राहता स्वतःला झोकून देत रंजित समर्थ आणि गणेश खोब्रागडे यांनी विविध उपक्रम आणि लोकपरंपरांचे अद्भुत दर्शन साहित्य संमेलनातून अजरामर केले.

राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे झाडीबोलीचे अभ्यासक असून त्यांचा साहित्य संमेलन आयोजनातील सहभाग आणि साहित्यिक प्रवास यामुळे पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.