संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी सहकार्य करा : अध्यक्ष संदिप कारमवार

विविध कार्यकारी सहकारी संस्थेची आमसभा संपन्न

मूल (प्रतिनिधी) : मूल सावली तालुक्यातील सुमारे 27 गावातील सभासद असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातुन शेकडो शेतकऱ्यांना करोडो रूपयाचे पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या सुखदुखात सदैव मदतीचा हात पुढे करणाÚया आपल्या संस्थेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भविष्यात व्यवसाय करण्याचा आमचा आनस असल्याने आपणही संस्थेला सदैव सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदिप कारमवार यांनी यावेळी केले. ते विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आमसभेदरम्यान उपस्थित शेतकऱ्याना मार्गदर्शन करताना बोलत होते.

सभेला प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद बोरूले, कोसंबीचे सरपंच तथा संस्थेचे संचालक रविंद्र कामडी, भोजराज गोवर्धन, विवेक मुत्यलवार, मनोज मुत्यालवार, सुधाकर कटकमवार, चंदाताई विनोद कामडी आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी संस्थेच्या माध्यमातुन विना व्याज उचललेली पिक कर्ज वेळेत भरणा करून संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे संचालक रविंद्र कामडी यांनी केले.

संस्थेचे सचिव संजय बद्देलवार यांनी संस्थेचा वार्षिक लेखाजोखा सभेसमोर मांडला, यावेळी उपस्थित शेतकÚयांनी साधक बांधक चर्चा करून सभेतील विषयांना मंजुरी प्रदान केली. यावेळी संस्थेचे सभासद उपस्थित होते.