तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी अविरोध

मूल (प्रतिनिधी) : गावातील तंटे गावात सुटावे यासाठी तालुक्यातील कोसंबी येथे नुकताच तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली.

अयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्रामपंचायत कोसंबीचे सरपंच रवींद्र कामडी होते. प्रमुख अतिथी म्हणून  कोसंबीच्या उपसरपंच सारिका गेडाम उपसरपंच, पोलीस पाटील अर्चना मोहुर्ले, ग्रामपंचायत सदस्य चंदाताई कामडी, ग्रामसेवक सुरज आकनपल्लीवार, कोसंबीचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार आदी उपस्थित होते.

यावेळी तंटामुक्त समितीची सभा घेण्यात आली दरम्यान समितीच्या अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांची अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी रोशनी मोहुलै, ज्ञानेश्वरी चौधरी, निर्मला लेनगुरे निशा सोनुले, विशु पेंदाम,लक्ष्मी रस्से, रूपा चौधरी, केशव निमसरकार, मनिष चौधरी, माधवराव सोनुले, दिवाकर कावळे,  निखिल मोहुलै, आदर्श शेंडे, नैताम सर, कोसंबीचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार, कडलवार सर राजेंद्र गिरडकर, सुभाष गुरनुले महाराज, देविदास गिरडकर, अंबादास गिरडकर, उमाजी पेंदाम, कालीदास गुरनुले, आणि गावातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांचे सरपंच रवींद्र कामडी यांचेसह नागरिकांनी अभिनंदन केले.