वाघाचा गुराख्यावर हल्ला, गुराखी जखमी

 

मूल तालुक्यातील आगडी येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस वाघाचे मानवावर हल्ले वाढत असतानाच रविवारी जनावरे घेवुन चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आगडी येथे घडली. अरविंद आबाजी गेडाम वय 42 वर्षे रा. आगडी असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या गुराख्याचे नांव आहे.

भारतामधुन गेल्या अनेक वर्षापासुन चित्ता हे प्राणी लुप्त पावलेले आहे, त्याचे परत पुर्नवसन करण्यासाठी शासन पुढाकार घेऊन मध्यप्रदेशातील एका प्राणी संग्रालयात सोडण्यात आलेले आहे. वन्यप्राणी वाचले पाहिजे यासाठी शासन, अधिकारी बारकाईने लक्ष देत असतानाच वन्यप्राण्याकडुन मानवावर होत असलेले हल्ला थांबावे यासाठी त्यांच्याकडुन पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिल्या जात नसल्याने दिवसेदिवस वाघाचे हल्ला वाढत आहे, मूल तालुक्यातील आगडी येथील अरविंद आबाजी गेडाम हे रविवारी बैल चराईसाठी जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने दुपारी 1.30 वाजता हल्ला करून जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या इतर गुराख्यानी आरडाओरड केल्याने वाघ निघुन गेल्याने इतर गुराख्यानी ही माहिती गावकÚयांना दिले, दरम्यान वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या अरविंद गेडाम यांना मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठुन पंचनामा करीत आहे.