मालधक्याच्या कामासाठी वृक्षतोड करण्यास विरोध

तहसील कार्यालयावरवर युवकांचा मुकमोर्चा

मूल (प्रतिनिधी): येथील रेल्वे स्टेशन परिसरात प्रस्तावित असलेल्या मालधक्काचे कामात जवळ असलेल्या असंख्य वृक्षांची तोड होणार असुन ते तोडण्यात येवु नये यासाठी आज (20 सप्टेंबर) रोजी तहसील कार्यालयावर युवकांनी मुकमोर्चा काढुन तिव्र विरोध करण्यात आला.

मूल येथील गांधी चौकात असलेल्या राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला मार्लापण करून शांततेत मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी मालधक्का हटाव पर्यावरण बचाव, निसर्ग आपली माता, तिचे आपण रक्षणकर्ता, पर्यावरणाची सुरक्षा हीच आहे तपस्या यासह विविध घोषणा देत मोर्चाकरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांकडे निवेदन सुर्पुद केले. यावेळी उपस्थितांनी मूल शहरात मालधक्का नकोच असे म्हणत आंदोलनाची गती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

यावेळी मूल बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.