मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अतुल कोल्हे भद्रावती
आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथील घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवर आरोपी पिता विरुद्ध माजरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले होते. दरम्यान २३ सेप्टेंबर रोजी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती माजरीचे ठाणेदार विनीत घागे यांनी दिली आहे.

भद्रावती तालुक्यातील माजरी येथील एका बापाने आपल्या अल्पवयीन मुली सोबत राहत्या घरी मुलगी एकटी असतांना तीच्या सोबत लैंगिक अत्याचार केला आहे . या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात २२ सेप्टेंबर रोजी आरोपी पित्याविरुद्ध बलात्कार , पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून २३ सेप्टेंबर रोजी आरोपी पित्याला वरोरा न्यायालयात समक्ष हजर केले असता १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली . दरम्यान आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मेघा गोखरे करीत आहे .