वाटप न केल्याने शाळेसाठी घेतलेले साहित्य धुळखात पडुन

सचिवांना सांगुनही वाटप केले नसल्याचा सरपंचाचा आरोप

मूल (प्रतिनिधी) : शासनाकडुन ग्राम पंचायतला आलेल्या निधीमधुन काही रक्कम शैक्षणिक कामासाठी खर्च करावा लागतो, यासाठी जानाळा ग्राम पंचायतने जानाळा, आगडी आणि फुलझरी येथील शाळेसाठी काही साहित्य खरेदी केले मात्र अनेक महिणे लोटुनही सदर साहित्य जानाळा येथील जिल्हा परिषद शाळेत धुळखात पडुन असल्याने ग्राम पंचायत प्रशासनाप्रती तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील ग्राम पंचायत अंतर्गत तिन गावे येत असुन तिन्ही गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, शासनाकडुन आलेल्या काही टक्के निधीमधुन शाळेला साहित्य खरेदी करून दयावे लागते, यावर्षी तिन्ही शाळेसाठी साहित्य खरेदी करून जानाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवण्यात आले मात्र अनेक महिणे लोटुन गेले मात्र अजुनही फुलझरी आणि आगडी येथील शाळेला साहित्य पुरवठा करण्यात आलेले नाही, यामुळे नेमके साहित्य घेण्यामागे ग्राम पंचायतचा हेतु काय असा सवालही यानिमीत्याने उपस्थित होत आहे.

सचिवांना सांगितलं मात्र त्यांनी अजुनही साहित्य वाटप केले नाही : सरपंच रंजना भोयर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साहित्य देण्यासाठी ग्राम पंचायत मार्फत साहित्य घेवुन ठेवण्यात आलेले आहे, साहित्य वाटप करण्यासाठी सचिवांना सांगितले मात्र अजुनही त्यांनी शाळेला साहित्य वाटप केलेले नाही अशी प्रतिक्रीया जानाळाच्या सरपंच रंजना भोयर यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.