सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी संघटीत होणे गरजेचे : डॉ. अभिलाषा गावतुरे

सत्यशोधक सुवर्ण महोत्सवानिमीत्य ग्रंथालय आणि वस्तीगृहाचे उद्घाटन

मूल (प्रतिनिधी) : शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असल्याने आजच्या स्थितीत आपल्या मुलांना शिकविणे अडचणीचे झालेले आहे, गरीब पालकांना उच्च शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, यामुळे महात्मा फुलें यांना अपेक्षीत असलेल्या सत्यशोधक समाज निर्माण करण्यासाठी संघटीत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरातील बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले. त्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमीत्य ग्रंथालय आणि मुलींच्या वस्तीगृह उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर होते. प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, सत्यशोधक विचारवंत प्रल्हाद कावळे गुरूजी, बहुजन चळवळीचे नेते प्रा. गुलाब मोरे, अखिल भारतीय समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, मूल तालुका पत्रकार संघाचे सचिव गंगाधर कुनघाडकर, हिरालाल भडके, ज्ञानज्योती फाउंडेशन सावलीचे अध्यक्ष दिनकर मोहुर्ले, डॉ. समीर कदम आदी उपस्थित होते.

विद्यार्थींनीसाठी ग्रंथालय आणि अभ्यासिकेची निमीर्ती करून दिल्या बद्दल श्री. नामदेव गावतुरे आणि सौ. शशिकला गावतुरे यांचे आयोजकांनी सत्कार केले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रशांत सोनुले, संचालन डॉ. दिपक जोगदंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. राकेश गावतुरे यांनी मानले. कार्यक्रमाला समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, भुमिपुत्र ब्रिगेड, ज्ञानज्योती फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.