कार-ट्रकच्या अपघातात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यु

मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी जवळ झाला अपघात

मूल (प्रतिनिधी) : पत्नीच्या उपचारासाठी चंद्रपूरला जात असताना आगडी जवळ समोरून येणाÚया एका ट्रकने धडक दिल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यु झाल्याची घटना गुरूवारला सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली. माणिक कुमरे  असे अपघातात ठार झालेल्या  निवृत्त  पोलीस उपनिरीक्षकाचे नांव आहे.

येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातुन निवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक माणिक कुमरे हे गुरूवारी सकाळी 10 वाजता दरम्यान पत्नी सुनिता कुमरे यांना घेऊन चारचाकी स्विप्ट वाहन क्रं. एम एच 31 डि के 2350 ने चंद्रपूरला जात होते. दरम्यान आगडी जवळ कार चालक रितीक मेश्राम रा. मारोडा याने समोरच्या वाहणाला ओव्हरटेक करीत असतांना चंद्रपूर वरून मूलच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या आयशर ट्रक क्र. सीजी 08 एटी 0769 ने ओव्हरटेक करीत असलेल्या स्विप्ट कारला जोरदार धडक दिली. दरम्यान अपघाताची माहिती होताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमध्यें दबलेल्या माणीक कुमरे आणि जखमी पत्नी सुनिता  कुमरे   आणि कार चालक रितीक मेश्राम यांना घेवून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. परंतू उपचारापूर्वीच गंभीर जखमी झालेले निवृत्त पोलीस उपनिरीक्षक माणीक कुमरे यांचे निधन झाले. पत्नी सुनिता आणि चालक रितीक यांनाही जबर मार लागल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रवाना करण्यांत आले. दरम्यान अपघातग्रस्त आयशर ट्रकचा चालक किशन गंगाप्रसाद पटेल याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.