भिषण अपघातात आजी नातु जागीच ठार

सावली (प्रतिनिधी) : मूल-गडचिरोली मार्गावरील सावली येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात धरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सावली येथे आज (दि. 18) रोजी सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान घडली. देवानंद उर्फ बबलू दादाजी किनेकार (वय 28) व लक्ष्मीबाई आनंदराव किनेकार (वय 78) असे मृतकाचे नाव असून दोघेही सावली तालुक्यातील सिर्सी येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक हे सावली येथील नातेवाईकांना भेटून दुचाकी क्र. एम एच 34 बिके झिरो 0145 या वाहनाने आपल्या स्वगावी सिर्सी कडे जात असताना मागून येणारा ट्रक क्र. एम एच 49 – 1127 या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही ट्रकच्या चाकाखाली आले. या धडकेत दुचाकीस्वार व त्याची आजी यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावलीचे ठाणेदार अशिष बोरकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.