साक्षी आणि नावेदची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

मूल (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन कराटे स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूलच्या दोन खेळाडूंची निवड जानेवारी मध्ये बिलासपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरीय कराटे स्पर्धेकरिता झाली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे शिक्षण घेत असलेला नावेद पठाण याने 84 किलो ग्राम वजन गटात आणि प्रतिभा महाविद्यालय, मूल येथे शिक्षण घेत असलेली साक्षी गुरनुले हिने 67 (मुली) किलो ग्राम या वजन गटात विजय मिळविला आहे. जानेवारी 2023 मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरीय कराटे स्पर्धा अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ, बिलासपूर (छत्तीसगढ) मध्ये पार पडणार आहे. होणाऱ्या या अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेत नावेद आणि साक्षी हे आपले खेळ आणि वजनगटात गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत.

दोन्ही खेळाडु कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक प्राशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात नियमित प्रशिक्षण घेतात तर दोघांना सहप्रशिक्षक अमान खान आणि साहिल खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंनी विशेष मार्गदर्शनासाठी सेन्सेई विनय बोढे आणि दोन्ही महाविद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांचे आभार मानले आहे.