परिसरात तणावाचे वातावरण
पंकज वडेट्टीवार, पोंभुर्णा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणुन शेतातील एका खांबावर लाईन दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन चा करंट लागुन मृत्यू झाल्याची घटना पोंभूर्णा उप पोलिस स्टेशन हद्दीतील चेक हत्तीबोडी येथे २२ आक्टोंबर ला दुपारी १२ वाजता उघडकीस आली. दिपक बाळा पेंदाम वय ३२ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो मुळचा सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी आहे. तो पोंभूर्णा येथील विज वितरण कंपनीत विद्यूत सहाय्यक पदावर कार्यरत होता.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोळी येथील लाईन दुरुस्ती करण्यासाठी डिपिवरील लाईन बंद असल्याची खात्री करून तो खंब्यावर चढला काही वेळ काम केल्यानंतर अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्याला करंट लागला यातच तो गतप्राण झाला. ग्रामिण रुग्णालय पोंभूर्णा येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतकाचे पश्च्यात आई, पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
परिसरात तणावाचे वातावरण
मृतकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व तत्काळ नौकरी देण्यात यावे यासाठी नातेवाईक, राजकीय पदाधिकारी व गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.