गळफास घेवुन शेतकऱ्याने केली आत्महत्या

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिचाळा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना जुना सोमनाथ दगड तलावाजवळील शेत शिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. भय्याजी वारजु मोहुर्ले वय 55 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.